Thursday, May 11, 2006

उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे


उलटसुलट केले काळज़ाला ज़रासे
परत डिवचले मी वादळाला ज़रासे

हसत अवस माझी काढते रोज़ खोडी
सतत लपवते ती चांदण्याला ज़रासे

चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, लीलया, मी तुलाही!"
(अज़ुन फ़सवतो मी या मनाला ज़रासे)

विसर पडत जातो पांगणाऱ्या उन्हाचा
फ़िरुन मळभ येते आसऱ्याला ज़रासे
--- चक्रपाणि गुरु, ११/०५/२००६

4 comments:

Sumedha said...

वा! काळजाला भिडले जरासे!

Surendra said...
This comment has been removed by a blog administrator.
Surendra said...

What Drives you? I am amazed! One more wonderful poetic piece.

Anonymous said...

तुझी ही कविता वाचून मला संयुक्ताचा 'तिसरा अंक' आठवला!!!
अगदी तुझ्याच शब्दात सांगायचं तर 'मूळ संहितेबरहुकूम सगळ्याच गोष्टी घडतील असे नाही. उत्स्फुर्तता जोडीस असली तर मूळ संहितेतील दोष/उणिवा झाकले/झाकल्या ज़ाणे अगर मूळ संहितेचे मूल्यवर्धन होणे या दोन्ही गोष्टी शक्य होऊ शकतात.' तुझ्याकडूनहि हीच उत्स्फुर्तता अपेक्षित होती आणि मला बरं वाटलं तु ही अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल!!!!