Sunday, May 07, 2006

पाठी फिराया झुरतात कोणी


आयुष्य सोने, लुटतात कोणी,
का या सणाला मुकतात कोणी?

अभ्यासताना इथली प्रमेये,
सोपी गणीते चुकतात कोणी.

का चालताना वळणांवरी या,
खोलात जाता बुडतात कोणी?

मागे पहाता मन सांडलेले,
पाठी फिराया झुरतात कोणी.

मीही न याला अपवाद व्हावे,
बागेत याही फुलतात कोणी.

मी छंदवेडा दुखऱ्या मनाचा,
ओठांत गाणी उरतात कोणी.

टाळून होतो बघ आसवांना,
मातीत मोती पुरतात कोणी!?
--- चक्रपाणि गुरु, २७/१०/२००५

6 comments:

A woman from India said...

नमस्कार,

तुमच्या कविता वाचल्या. छान आहेत. बहुतेक सगळ्या आवडल्या, पण गोर्‍या कातडीवर केलेल्या कवितेशी मात्र मी सहमत नाही. माझा नवरा भारतिय, पण अमेरिकेत वाढलेला आहे, आणि त्याच्यामुळे माझी अमेरिकेतील अनेक चांगल्या गोष्टींशी(ही) ओळख होते आहे. कधी कधी त्यांची तळ्मळ पाहुन आश्चर्य वाटतं. परवा आम्ही Wiston Salem मधे एका cafe मधे गेलो होतो. हा cafe बहुतांशी volunteers नी चालवलेला आहे आणि सर्व उत्पन्न सेवाभावी संस्थांना दिले जाते. अशी अनेक उदाहरणे मी देउ शकते. आपण भारतिय लोक आपले घर, नातेवाईक, मित्र वगळता इतरांना फ़ारशी मदत करायला धावुन जात नाही. इथे मात्र दवाखाना, रेल्वे, म्युझियम, अग्निशमन, शिक्षण संस्था इतकच काय, 911 सेवेतही volunteers चा भरणा पाहुन "अचंबा" वाटतो!!

तुमच्या कविता मात्रं छानच आहेत!!!!

-
संगीता गोडबोले,
डरहॅम

Chakrapani said...

संगीताताई, प्रतिसादाबद्दल अनेक आभार. गोऱ्या कातडीवरील कविता ही या लोकांचे दोष दाखवण्याचा एक प्रयत्न समजावी. यांच्या ज्या गोष्टी अनुकरणीय आहेत त्याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही. किंबहुना आपणही त्या आत्मसात करायला हव्यात असेच मलाही वाटते. काही वेळा यांच्या दुटप्पी धोरणाची कीव आणि संताप येतो. अशा वेळी मनात उमटणारे विचार तेथे व्यक्त केले आहेत इतकेच. अन्यथा, केवळ तक्रारच करायची आहे या हेतूनं ती कविता लिहिलेली नाही.क्ऱुपया तसा गैरसमज होऊ देऊ नये.
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार. कविता आणि गझला तुम्हाला आवडल्या हे वाचून आनंद झाला.
--- चक्रपाणि, राले, North Carolina

A woman from India said...

चक्रपाणि,

Friendly suggestion - please don't mind, you may want to try this -
कृपया - मधला कृ लिहिण्यासाठी k shift+r, release shift, u.
गोर्‍या मधला र्‍या लिहिण्यासाठी r, shift 6 yaa

-
संगीता

Chakrapani said...

dear Sangeeta tai,
Whatever you have suggested is very much correct and that's the way it should be done. However, my previous comment has been compiled and edited in a different editor on classifieds web site that is mainly used to interpret keystrokes in hindi and hence i must have goofed up at couple of places..thanks anyway for the suggestion and i will definitely try to use my regular editor for flawless typing hereafter :)

Anonymous said...

mala kvitetla phrasa gamya nahi!!
tymule pahilyanada vachali teva nit kalali nahi. mhanun atta parat vachali. chhan ahe.tyatala ashay bhavla. ani mag 'Pu. La.'cha amerikevarla lekhhi athavala.
paristhiti itakya varshanni pharshi badalaleli disat nahi!!!!
mala ameriket asanaryaa lokanvishyi (bharatiy nave) ek kutuhal ahe. It is called as big melting pot!! anek prakarchya sanskruti yethe ekatra alya ani yetahet. tya lokana 'best of all cultures' gheun ek navin ankhi changli sanskruti nirman karata ali asati. pan asa jhal nahi. swatantryacha atireki havyas ani uchcha darjachi tehnological advancement yat manase ekamekanna duravat jatahet. asa ka vav? tula akay vatat te nakki kalav.
-Rochin.

Anonymous said...

top [url=http://www.xgambling.org/]casino bonus[/url] brake the latest [url=http://www.casinolasvegass.com/]casino bonus[/url] manumitted no deposit bonus at the leading [url=http://www.baywatchcasino.com/]online casinos
[/url].