(मालिनी)
(गणः- न-न-म-य-य)
(गणः- न-न-म-य-य)
---------------------------------
जलद गरजताना आसुही गात होते,
किरण मिसळताना हासुही साथ होते.
बिजलि थिरकताना श्वास झोकात डोले,
वळुनि बिलगताना ओठ ओठांत ओले.
किरण मिसळताना हासुही साथ होते.
बिजलि थिरकताना श्वास झोकात डोले,
वळुनि बिलगताना ओठ ओठांत ओले.
नितळ जल गुलाबी लाल तू लाजलेली,
हसत जवळ येता लांब तू जाहलेली.
प्रणय उमलताना सांजही आटलेली,
विरहस्मृति सखीची आजही दाटलेली.
हसत जवळ येता लांब तू जाहलेली.
प्रणय उमलताना सांजही आटलेली,
विरहस्मृति सखीची आजही दाटलेली.
फिरुन बरसता पाऊस काही खुणावी,
नयन निथळता प्याल्यात तीही बुडावी.
सहज तडपताना वेदना ना उरावी,
तुज न विसरताही पापणी का सुकावी?
नयन निथळता प्याल्यात तीही बुडावी.
सहज तडपताना वेदना ना उरावी,
तुज न विसरताही पापणी का सुकावी?
--- चक्रपाणि सोम, २२/०८/२००५
2 comments:
चक्रपाणी,
छंदोबद्ध कवीता २१ व्या शतकातही जीवंत आहे हे वाचून झालेला आनंद व्यक्त करण्यास शब्द खरोखरच थिटे पडताहेत. ह्या कवीतेचे एक वैशिष्ट्य मला आवडले - ही साधी कवीता नसुन छंदोबद्ध (मराठी) गझल आहे! छानच.
खांडेकर साहेब,छंदबद्ध कविता लिहिणाऱ्यांबरोबरच त्यांचा
आस्वाद घेणारे तुमच्यासारखे रसिक असतील तर कोणत्याही शतकात छंदबद्ध कवितेस मरण असणार नाही याची खात्री बाळगण्यास हरकत नाही. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
एक आवर्जून नमूद करावेसे वाटते की ही गझलसदृश कविता, गझल नसून छंदबद्ध कविता आहे.दोन्हीमध्ये काही सूक्ष्म भेदाभेद आहेत, जे यथावकाश स्पष्ट करण्याचा मानस आहे.कविता जगण्याचा आणि जगवण्याचा हा माझा प्रयत्न आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनाच्या पाठबळावर यशस्वी होवो, हीच सदिच्छा.
पुनश्च धन्यवाद.
Post a Comment