Friday, July 11, 2008

छचोर

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!

2 comments:

आशा जोगळेकर said...

Good. Keep it up

प्रशांत said...

>>>>फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं<<<<

वाह वा! लगे रहो. :)

संदीप खरे यांच्या एका कवितेतलं एक कडवं आठवलं -

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही