Friday, February 11, 2022

शिलालेख

कोऱ्या कॅनव्हासला
मोकळ्या केसांच्या
घेऊन मांडीवर रंगवायला
बसतो मी

बोटांचे स्ट्रोक्स...पोटावर
ओठांचे ठसे…ओठांवर
लखलखणारं मुक्तहस्तचित्र
नक्षीदार श्वासांनी
वळणदार भिवया, मान, पाठ,
बंद हसऱ्या डोळ्यांवर
… हसतो मी
वळणाकडे कर्णमधुर पुटपुटणाऱ्या
करून कानाडोळा
रंग दोघांच्याच स्वप्नांचे
(भरायला म्हणा, उधळायला म्हणा)
मुठीत घट्ट (की घट्ट मिठीत?!)
घेतो मी..
अर्धोन्मिलित, मूकमनस्वी
खस्कन् स्वतःत
ओढून घेणारी
जाग त्याची
होतो मी
दोन एकजीव कपाळांवर
का दोन वेगळे शिलालेख
आकाशातल्या चित्रकाराला
एकच एक प्रश्न
उरतोही..
.. नुरतोही